न. प. शाळेत भरविलेल्या चित्रप्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : सिल्लोड नगरपरिषदेच्या शाळेत सर्पविज्ञान या विषयावर अंनिस कार्यकर्ते सुनिल चौथमल यांनी भरविलेल्या चित्रप्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिल्लोड आणि प्रशालेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी चित्रप्रदर्शन भरविले.

प्रशालेचे मुख्याध्यापक नारायण चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या प्रदर्शनास प्रमुख पाहुणे म्हणून अंनिसचे जिल्हा प्रधान सचिव प्रा. शिवाजी वाठोरे, शाखा प्रधान सचिव नारायण फाळके, प्रकाश दौड आदी होते. चित्र प्रदर्शनात सापाच्या विविध जाती, त्यांच्या विषयी सामान्यांच्या मनात असलेल्या अंधश्रद्धा आदींविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

या वेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या शंकाचे निरसन करण्यात आले. राज रगडे, सचिन खरात, असद शेख, आलिया कुरेशी, अंजली खंडागळे, प्रिन्स छल्ले, अमान शेख आदी विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरात सहभाग नोंदविला. प्रा. शिवाजी वाठोरे, नारायण फाळके यांनीही विचार मांडले. सूत्रसंचालन जयश्री देवरे तर जेबा बागवान यांनी आभार मानले. मनिषा जैस्वाल, आस्लम सय्यद, संजय राठोड, जावेद दळवी, सुनिल पावरा, जेबा बागवान, जोगेश्वरी पाटील आदींनी परिश्रम घेतले.